केशव राठोड यांच्याकडून जाकादेवी प्रशालेला प्रिंटरची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:23+5:302021-08-13T04:36:23+5:30

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक केशव बसवंत राठोड यांनी ...

Printer's gift to Jakadevi school from Keshav Rathod | केशव राठोड यांच्याकडून जाकादेवी प्रशालेला प्रिंटरची भेट

केशव राठोड यांच्याकडून जाकादेवी प्रशालेला प्रिंटरची भेट

googlenewsNext

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय येथे कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक केशव बसवंत राठोड यांनी सुमारे १५ हजार रुपये किमतीचा प्रिंटर शाळेला भेट स्वरूपात दिला.

जाकादेवी विद्यालय येथे आयोजित पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व मालगुंड शिक्षण संस्थेच्यावतीने राठोड यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी राठोड यांनी शाळेला प्रिंटरची भेट दिली. राठोड यांनी गेली तीस वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये कामगिरी केली. हा समारंभ प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ पाटील, काजुर्ली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल पवार, शिक्षक प्रतिनिधी अनिल पाटील, शिवानंद गुरव, सांस्कृतिक विभागप्रमुख संतोष पवार, ज्येष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे, नामदेव वाघमारे, अमित बोले, सुशांत लाकडे, मंदार रसाळ, अवधूत जाधव उपस्थित होते.

Web Title: Printer's gift to Jakadevi school from Keshav Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.