लवेल येथे गांजा विक्री करणारा प्राैढ ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST2021-06-20T04:21:56+5:302021-06-20T04:21:56+5:30

खेड : तालुक्यातील लवेल येथे गांजा विक्री करणाऱ्या प्रौढाला खेड पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडत गजाआड केले. पोलिसांनी या ...

Pride arrested for selling marijuana in Lovell | लवेल येथे गांजा विक्री करणारा प्राैढ ताब्यात

लवेल येथे गांजा विक्री करणारा प्राैढ ताब्यात

खेड : तालुक्यातील लवेल येथे गांजा विक्री करणाऱ्या प्रौढाला खेड पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडत गजाआड केले. पोलिसांनी या कारवाईमध्ये ४८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, १७ जून रोजी महामार्गावर लवेल येथे समाधान हॉटेलजवळ इस्तीयाक अ. कादीर शहा (४८, रा. घाणेखुंट, गवळीवाडी) हा पांढऱ्या रंगाची इंडिगो कार (एमएच ०६, सी ६४३६)मधून रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला गांजाचा साठा घेऊन ग्राहकांना विक्री करण्यासाठी आला हाेता. यावेळी सापळा रचलेल्या पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

यावेळी त्याच्याकडे ७,५०० रुपये किमतीचा ५१४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. पोलिसांनी गांजासह ४० हजार रुपये किमतीची सफेद रंगाची इंडिगो कार, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ४८,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयितावर अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.

-- ----------------------------

खेड पोलिसांनी लवेल येथे गांजा विक्री करणाऱ्या प्रौढाला रंगेहात पकडले.

Web Title: Pride arrested for selling marijuana in Lovell