रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची उद्या निवड

By Admin | Updated: March 20, 2017 16:52 IST2017-03-20T16:52:06+5:302017-03-20T16:52:06+5:30

अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार पीठासन अधिकारी

President of Ratnagiri Zilla Parishad, Vice Chancellor elected tomorrow | रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची उद्या निवड

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची उद्या निवड

रत्नागिरी, दि. २0 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची उद्या, मंगळवार, २१ रोजी निवड होणार आहे. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार पीठासन अधिकारी म्हणुन काम पाहाणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ गट आणि ११० पंचायत समितीच्या गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान तर २३ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर जिल्ह्यातील नऊ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवड १४ रोजी झाली. उद्या, मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे.
यासाठी होणाऱ्या निवडीचा कार्यक्रम असा - ११ ते १ या वेळात अर्ज स्वीकारणे, दुपारी ३ ते ३.१५ या कालावधीत अर्जांची छाननी, त्यानंतर ३.३० वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत, त्यानंतर आवश्यकता असल्यास मतदान होणार आहे.
या निवडणूक प्रक्रियेसाठी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: President of Ratnagiri Zilla Parishad, Vice Chancellor elected tomorrow