राजापुरात अवकाळी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST2021-04-13T04:30:06+5:302021-04-13T04:30:06+5:30
राजापूर : दोन दिवस होत असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर रविवारी रात्री पावसाने राजापूर तालुक्यात हजेरी लावली. रात्री काही वेळ ...

राजापुरात अवकाळी पावसाची हजेरी
राजापूर : दोन दिवस होत असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर रविवारी रात्री पावसाने राजापूर तालुक्यात हजेरी लावली. रात्री काही वेळ विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे हवेत काहीसा गारवा पसरला असला तरी अवकाळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका निर्माण झाला आहे. तालुक्याच्या विविध भागात रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती.
तालुक्याच्या पूर्व परिसरातही रविवारी रात्री १० वाजल्यानंतर विजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे पाऊस पडत होता. तालुक्यात मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याची घटना घडल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात झालेली नाही. या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका तालुक्यातील आंबा व काजू पिकाला बसेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.