पाणी आराखडा तयार

By Admin | Updated: February 18, 2015 00:54 IST2015-02-18T00:54:41+5:302015-02-18T00:54:41+5:30

राजापूर तालुका: निधीची उपलब्धता होणे आवश्यक

Prepare the water plan | पाणी आराखडा तयार

पाणी आराखडा तयार

राजापूर : मागील काही वर्षांत वेळेवर पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार न झाल्याने वेळेवर निधी मिळाला नाही आणि टँकरने पाणी पुरवठा करणे महाकठीण ठरले. मात्र, यावर्षी राजापूर पंचायत समिती प्रशासनाने वेळेवर टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ३८ गावे व ७८ वाड्यांना ३ कोटी ७५ लाख १० हजार अंदाजीत खर्च अपेक्षित आहे.
या आराखड्यात ताम्हाणे चव्हाणवाडी, धनगरवाडी, शेंडेवाडी, पळसमकरवाडी, मोरोशी, तळेवाडी, टेंबवाडी, खरवते वाणेवाडी, धनगरवाडी, हसोळतर्फे सौंदळ, कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, विठ्ठलवाडी, कारवली, गाववाडी बौद्धवाडी, वरचीवाडी, केळवली मोसम, झर्ये धनगरवाडी, जवळेथर धावडेवाडी, मावळतवाडी, ताम्हाणे, चव्हाणवाडी धनगरवाडी, पेड्ये - गुरववाडी, पहिलीवाडी (मधलीवाडी), शेंडेवाडी, कळसवली पळसमकरवाडी, कोष्टेवाडी, गोठणे दोनिवडे, हातणकरवाडी बौद्धवाडी, साखरकरवाडी, गो. दो. शाळा क्र. १ किंजळवणे, नाचणेकर वाडी, नेरकेवाडी क्र. ३, हातणकरवाडी, तांबळवाडी, हुंबरवाडी, हातणकरवाडी कडे कुडकुडवाडी, दळवीवाडी, साखरीनाटे, प्रादेशिक योजना मोरोशी तळेवाडी, टेंबवाडी, आंगले, साळसरकरवाडी, खरवते वाणेवाडी, हसोळतर्फे सांैदळ कोंडलाडवाडी, बौद्धवाडी, तळवडे जंगमवाडी, ब्राह्मणदेव धनगरवाडी, कारवली, विठ्ठलवाडी, गाववाडी बौद्धवाडी, वरचीवाडी, कोंड्येतर्फे राजापूर गाडगीळवाडी महाळुंग धनगरवाडी, पांगरी बुद्रुक बागवाडी, केळवली, कुंभवडे, हरचलीवाडी, मधलीवाडी बौद्धवाडी, रामणवाडी, भरडवाडी, देवाचे गोठणे, सोंड्येवाडी, मयेकरवाडी, कातळीवाडी, धाऊलवल्ली, सोंड्येवाडी, पोकळेवाडी, मधला वठार, रूमडे वठार, पाखाडी, खरवते बौद्धवाडी, दोनिवडे धनगरवडी, तळवडे धनगरवाडी, झर्ये धनगरवाडी, कोदवली धनगरवाडी, मांडवेवाडी, मांडवकरवाडी शाळा नं. २ पाथर्डे धनगरवाडी, धोपेश्वर तिथवली धनगरवाडी, चिखले धनगरवाडी, बारसू धनगरवाडी शाळा, पांगरे बु. गावमळा, धावडेवाडी, मावळतवाडी, मूर चिखलेवाडी, मुरवाळवड करक आंबा, जांभळवाडी, मधलीवाडी, तांबळवाडी, चिखलगाव, ठिकावडी, सुर्वेवाडी, वाटुळ म्हादयेवाडी, गोळवाडी, कोेंड्येतर्फे सौंदळ तांबळवाडी बौद्धवाडी, अजिवली बाणेवाडी बौद्धवाडी, वाडापेठ, धावडेवाडी, प्रिंदावण, तळेखाजण, कणेरे बौद्धवाडी, हातदे पाटीलवाडी, शीळ वरचीवाडी, कोल्हेवाडी असा समावेश असून बहुतांशी वाड्यांमध्ये धनगरवाडे व बौद्धवाड्या यांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त विंधन विहिरी नळपाणी योजनांची दुरुस्ती करणे तात्पुरती पुरक नळयोजना घेणे, खासगी विहिरी अधिग्रहीत करणे, टँकरने, बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, असा १ आॅक्टोबर २०१४ ते ३० जून २०१५ संकलित आराखडा देखील तयार करण्यात आलेला आहे.
अखेरच्या टप्प्यात याव्यतिरिक्त संभाव्य गावे व वाड्या या कोणत्या असतील, त्याचा अंदाज घेऊन हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. निधीची तरतूद झाल्यास टंचाईग्रस्त गावे व वाड्यांवर पाण्याचे टँकर पोहचू शकतील, याची खबरदारी घेणे प्रशासनावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. (प्रतिनिधी)


 

Web Title: Prepare the water plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.