शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापुरातील ‘रावणाला’ राज्य संरक्षित दर्जा, काय आहे हे कातळशिल्प.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:13 IST

पुढील दोन महिन्यांत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन

राजापूर (जि.रत्नागिरी) : देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १३ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत त्यासाठी हरकती वा सूचना मागवल्या आहेत.तालुक्यातील देवाचेगोठणे येथे सर्व्हे नं. १६५/१ या मुकुंद वासुदेव आपटे व गोविंद शंकर आपटे यांच्या जमीन मिळकतीत हे प्रागैतिहासिककालीन कातळशिल्प आढळले आहे. या कातळशिल्पामध्ये एक मनुष्यकृती दर्शवण्यात आली आहे. प्रागैतिहासिक काळातील मानवाने निर्माण केलेली ही कलाकृती व उथळ शिल्प कोरण्यात आले आहे. चुंबकीय विस्थापनाच्या क्षेत्राच्या अस्तित्वामुळे या कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे.संरक्षित करावयाच्या जागेचे स्मारकासह एकूण क्षेत्रफळ ८०.०० चौरस मीटर आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अन्वये ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.या स्मारकात हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दोन महिन्यांच्या आत संबंधित स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या घोषणेला हरकत घेता येणार आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने या प्राथमिक अधिसूचनेची प्रत स्मारकाजवळ ठळक ठिकाणी लावण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

काय आहे हे कातळशिल्पदेवाचे गोठणे येथे हे कातळशिल्प आहे. या कातळशिल्पांमध्ये आदिमानवाने विविध आकार कोरलेले आहेत आणि ती ४५ हजार वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. येथे जांभा दगडावर विविध आकार कोरलेले आहेत, जे आदिमानवाच्या कलेचा आणि संस्कृतीचा भाग मानले जातात.

इतिहास उलगडण्यास मदतयेथील कातळशिल्पे ऐतिहासिक आणि पुरातात्त्विकदृष्ट्या महत्त्वाची मानली जातात. ती मानवी वस्ती आणि कलेचा इतिहास उलगडण्यास मदत करणारी आहेत. देवाचे गोठणे येथील कातळशिल्पांमध्ये रावणसड्यावरील कातळशिल्प विशेष प्रसिद्ध आहे. या परिसरात होकायंत्र व्यवस्थित काम करत नसल्याचे दिसले आहे.