प्रवीण काटकर यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST2021-03-20T04:30:53+5:302021-03-20T04:30:53+5:30

दापोली : रत्नागिरी जिल्हा परिषदेचा या वर्षीचा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार दापोली तालुक्यातील वणौशी गुरव व गिम्हवणेचे केंद्रप्रमुख प्रवीण काटकर ...

Praveen Katkar felicitated | प्रवीण काटकर यांचा सत्कार

प्रवीण काटकर यांचा सत्कार

दापोली : रत्नागिरी जिल्हा परिषदेचा या वर्षीचा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार दापोली तालुक्यातील वणौशी गुरव व गिम्हवणेचे केंद्रप्रमुख प्रवीण काटकर यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा नुकताच दापोली येथील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा परिषदेने या वर्षीपासून जिल्ह्यातील दोन आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. विविध निकषांच्या आधारे केंद्रप्रमुखांच्या कामांचे गुणांकन करून अव्वल गुणांकन प्राप्त करणाऱ्या दोन केंद्रप्रमुखांना या वर्षीचा आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार देण्यात आला. त्यात काटकर यांचा समावेश आहे. त्यानिमित्त दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्राच्या शिक्षण परिषदेचे औचित्य साधून गिम्हवणे केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने उच्चश्रेणी मुख्याध्यापक सदाशिव रसाळ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन काटकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दापोली प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, खेडचे गटशिक्षण अधिकारी संतोष भोसले उपस्थित होते.

..............

फोटो आहे.

Web Title: Praveen Katkar felicitated