शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

‘पदवीधर’ निवडणुकीत विधानसभेचीही तयारी, प्रसाद लाड : भाजपतर्फे रत्नागिरीतून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:47 IST

कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीतर्फे प्रचार करताना एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची गरळ ओकण्यात आली. मात्र, या निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील आमदार व उमेदवारीसाठी इच्छुकांनी गावागावात जाऊन प्रचार केला. अप्रत्यक्षरित्या त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात प्रचार पदवीधरचा, तयारी विधानसभेचीविधानसभेसाठी इच्छुकांचाही पदवीधर प्रचारात वाढला उत्साह

प्रकाश वराडकर रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीतर्फे प्रचार करताना एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांची गरळ ओकण्यात आली. मात्र, या निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील आमदार व उमेदवारीसाठी इच्छुकांनी गावागावात जाऊन प्रचार केला. अप्रत्यक्षरित्या त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात सध्या सेनेचे सदानंद चव्हाण , उदय सामंत व राजन साळवी हे तीन, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संजय कदम आणि भास्कर जाधव हे दोन आमदार आहेत. या दोन्ही पक्षांचे जिल्ह्याच्या राजकारणावर चांगलेच वर्चस्व आहे.

आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. राज्यातील सेना-भाजप युतीमधील बेबनावाची स्थिती पाहता मुदतपूर्व निवडणुकांची शक्यताही नाकारता येणार नाही. या स्थितीत जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघावरील पकड घट्ट ठेवण्याचे जोरदार प्रयत्न विद्यमान आमदारांकडून सुरू आहेत.कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही विद्यमान आमदार व २०१९मधील उमेदवारीसाठी इच्छुकांसाठी मोठीच पर्वणी ठरल्याची चर्चा आहे. आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पदवीधरच्या निवडणूक प्रचारात हिरीरीने सहभाग घेतला. अर्थात कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक व पदवीधर निवडणूक ही सर्व पक्षांसाठी विधानसभेच्या तयारीसाठी मोठी संधी होती.

रत्नागिरी मतदारसंघात आमदार सामंत यांनी त्यांची पकड मजबूत केलेली आहे. परंतु पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रत्नागिरीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे २०१९च्या निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केल्याचीही चर्चा आहे.दापोली-खेडचे आमदार संजय कदम, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांनीही या निवडणुकीच्या निमित्ताने पदवीधरच्या उमेदवाराचा प्रचार करताना विधानसभा निवडणुकीची तयारीही केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अनेक मोठ्या घटना, फेरबदलांची शक्यता असून, विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत.नाणारची डोकेदुखीनाणारची डोकेदुखी असली तरी पदवीधर निवडणुकीत आमदार राजन साळवी यांनी राजापूरमध्ये पाय घट्ट रोवण्याचे प्रयत्न केले आहेत.‘डाव’ त्यांचा, प्रचार यांचा!पदवीधरमध्ये डावपेच कोणाचे व ते खरे ठरविण्यासाठी उमेदवाराच्या प्रचारात आपलाही प्रचार काहींनी केल्याची चर्चा आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी