अज्ञात कारणातून प्राैढाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST2021-06-06T04:23:35+5:302021-06-06T04:23:35+5:30

रत्नागिरी : तालुक्यातील हरचेरी कसबा येथे अज्ञात कारणातून प्रौढास शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पती-पत्नी विरोधात ग्रामीण ...

Praidha beaten for unknown reasons | अज्ञात कारणातून प्राैढाला मारहाण

अज्ञात कारणातून प्राैढाला मारहाण

रत्नागिरी : तालुक्यातील हरचेरी कसबा येथे अज्ञात कारणातून प्रौढास शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पती-पत्नी विरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताचा सुमारास घडली.

याप्रकरणी चंद्रशेखर मधुकर (४५, रा. कसबा हरचेरी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, जयसिंग दत्तात्रय राऊत आणि देवयानी जयसिंग राऊत (दोन्ही रा. हरचेरी, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चंद्रशेखर मधुकर हे शुक्रवारी शेतात काम करीत असताना आंबार्डेकर यांच्या ३ गुंठे जमिनीतील पेरणीचे काम पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा राऊत दाम्पत्याने त्या ठिकाणी येऊन चंद्रशेखर मधुकर यांना शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.

Web Title: Praidha beaten for unknown reasons