वाटूळ परिसरात विजेचा लपंडाव सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST2021-07-16T04:22:21+5:302021-07-16T04:22:21+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क वाटूळ : मुंबई - गाेवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील वाटूळ गावामध्ये मे महिन्यापासून सातत्याने खंडित हाेणाऱ्या विजेमुळे ...

Power outage started in Vatul area | वाटूळ परिसरात विजेचा लपंडाव सुरु

वाटूळ परिसरात विजेचा लपंडाव सुरु

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाटूळ : मुंबई - गाेवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील वाटूळ गावामध्ये मे महिन्यापासून सातत्याने खंडित हाेणाऱ्या विजेमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. नियमित दिवसातून चार ते पाचवेळा विजेची ये-जा सुरू असते. नेमकी समस्या समजूनही वीज विभागाकडून कायम ताेडगा निघत नसल्याने येथील समाजसेवक बाळकृष्ण चव्हाण यांनी आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत वाटूळमधील ग्रामस्थ व मुंबई क्रिकेट असाेसिएशन सदस्य समाजसेवी बाळकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांनी मे महिन्यापासून ओणी परिमंडळ अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून तसेच लेखी समस्या लक्षात आणून दिली हाेती. मात्र, आजपर्यंत यात काेणतीही सुधारणा झालेली नाही. पावसाळ्यात मुबलक पाऊस असूनही विजेच्या लपंडावामुळे मीटर बंद असल्याने पाणी समस्याही निर्माण हाेत आहे. नेहमीच या त्रासामुळे ग्रामस्थ हैराण असून, शंभर टक्के वीजबिलांचा भरणा असूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आपण कायार्लयात ठिय्या आंदाेलन करु, असा इशारा बाळकृष्ण चव्हाण यांनी दिला आहे.

Web Title: Power outage started in Vatul area