रत्नागिरीत २३ रोजी डाक अदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:29+5:302021-09-11T04:32:29+5:30
रत्नागिरी : येथील अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय (गोगटे जोगळेकर कॉलेजशेजारी) येथे २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालत ...

रत्नागिरीत २३ रोजी डाक अदालत
रत्नागिरी : येथील अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय (गोगटे जोगळेकर कॉलेजशेजारी) येथे २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता डाक अदालत आयोजित केली आहे.
डाक सेवेबाबतची तक्रार अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्या नावे १७ सप्टेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पाठवावी, असे या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
रस्ते झाले सामसूम
देवरूख : बाप्पाच आगमन शुक्रवारी सकाळी झालं. काहींना गुरुवारी रात्रीच मूर्ती आणून ठेवल्या होत्या. काहींच्या घरी शुक्रवारी सकाळी गणराज आले. त्यामुळे सकाळपर्यंत रस्त्यावर गजबजाट होता. मात्र, गणेशाच्या आगमनात आणि पुजेत सर्व भक्त गुंतल्याने दुपारी सर्वच रस्त्यांवर सामसूम पसरली होती.
मुृंबईत २९ रोजी डाक अदालत
रत्नागिरी : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे २९सप्टेंबर रोजी सकाळी वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये ११६ वी डाक अदालत आयोजित केली आहे. यात टपाल वस्तु , मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र आदींबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.
मृतदेह दहन-दफनास बंदी
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील नजीर जुवळे यांच्या घरासमोरील नदीचे पात्रात शासकीय जागेत ज्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो त्या वादग्रस्त जागेत मृताचे दहन, दफन करून किंवा अन्य तऱ्हेने त्यांची विल्हेवाट लावण्यास मनाई करणारा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी ९ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीसाठी जारी केला आहे.
क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत
रत्नागिरी - पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजीद्वारा क्षेत्रीय स्तरावरील ४९ वी डाक अदालत २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या कार्यालयात आयोजित केली आहे. डाक सेवेबाबतची तक्रार रमेश प्रभू, सेक्रेटरी डाक अदालत व सहायक डाक निदेशक, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी 403001 यांच्या नावे १३ सप्टेंबरपर्यंत पाठवावी.