नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु
By Admin | Updated: July 6, 2014 00:51 IST2014-07-06T00:51:16+5:302014-07-06T00:51:16+5:30
सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रद्द

नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु
राजापूर : सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय खुद्द शासनानेच रद्द केल्याने राजापूर न. प.च्या नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यानुसार नगराध्यक्षपदासाठी नगरसेविका मिना मालपेकर व मुमताज काझी यांना तर उपनगराध्यक्षपदासाठी रवींद्र बावधनकर यांचे नावे आघाडीवर आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदास ६ महिन्यांची मुदत देणारा निर्णय राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. खुद्द शासनानेच तो निर्णय रद्द ठरविल्याने या पदाच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. राजापूर पालिकेवर आघाडीची सत्ता असून १० नगरसेवक काँग्रेसचे तर दोन राष्ट्रवादीचे आहेत. उर्वरित पाच अन्य पक्षांचे आहेत. आघाडीकडे बहुमत असले तर यापूर्वी चार नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने पक्षापुढे पेचप्रसंग असला तरी सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ आठवर जाते. त्यानुसार नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून विद्यमान नगरसेविका मिना मालपेकर आणि मुमताज काझी यांची नावे चर्चेत आहेत. तर उपनगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र बावधनकर यांचे नाव चर्चेत आहे. ६ जुलैपासून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. (प्रतिनिधी)