साेन्याची माळ घेऊन फिरणारा पाेलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST2021-07-15T04:22:21+5:302021-07-15T04:22:21+5:30

रत्नागिरी : मारुती मंदिर ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर तुटलेली साेन्याची माळ घेऊन फिरणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात ...

In the possession of the Paelis, who was carrying the Saenya necklace | साेन्याची माळ घेऊन फिरणारा पाेलिसांच्या ताब्यात

साेन्याची माळ घेऊन फिरणारा पाेलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : मारुती मंदिर ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर तुटलेली साेन्याची माळ घेऊन फिरणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली. या माळेची किंमत सुमारे ४५,५०० रुपये इतकी आहे.

पाेलिसांनी याप्रकरणी हेमंत रवींद्र सुर्वे (३०, मूळ रा. मालाड, मुंबई) याला ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सायंकाळी हेमंत सुर्वे मारुती मंदिर ते साळवी स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर सोन्याची तुटलेली माळ घेऊन फिरत होता. या प्रकाराची माहिती शहर पाेलिसांना मिळाल्यानंतर पाेलीस त्याच्याजवळ आले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चाैकशी केली. त्यावेळी त्याने पाेलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पाेलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: In the possession of the Paelis, who was carrying the Saenya necklace