शाळा व्यवस्थापन समितीचा सकारात्मक पुढाकार संकटमोचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:17+5:302021-07-10T04:22:17+5:30

अडरे : शाळा व्यवस्थापन समितीचा सकारात्मक पुढाकार सध्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी संकटमोचक ठरू शकतो, असे प्रतिपादन विकास सहयोग प्रतिष्ठानचे ...

Positive initiative of school management committee | शाळा व्यवस्थापन समितीचा सकारात्मक पुढाकार संकटमोचक

शाळा व्यवस्थापन समितीचा सकारात्मक पुढाकार संकटमोचक

अडरे : शाळा व्यवस्थापन समितीचा सकारात्मक पुढाकार सध्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी संकटमोचक ठरू शकतो, असे प्रतिपादन विकास सहयोग प्रतिष्ठानचे विभागीय समन्वयक विजय कदम यांनी केले. गुहागर तालुक्यातील वेलदूर प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील कार्यक्रमात ते बोलत होते.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज फाऊंडेशन आणि विकास सहयोग प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने गुहागर तालुक्याच्या किनारपट्टी भागात निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त १० प्राथमिक शाळांची दुरुस्ती आणि डागडुजीचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाच्या आढावा आणि नियोजन बैठकीला मार्गदर्शन करताना कदम बोलत होते. ते म्हणाले की, सध्याच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीने ठरवले तर शाळेत अनेक महत्त्वाच्या उपक्रमांना सुरुवात करता येईल. मात्र, आज तशी मानसिकता दिसून येत नाही. शाळेत कसे यावे ही जरी भीती असली तरी काही नियम पाळून स्वतःची आणि इतरांची पुरेशी काळजी घेतली तर किमान ठप्प झालेल्या काही बाबी पुढे नेता येतील.

या बैठकीचे स्थानिक नियोजन प्राथमिक शाळा वेलदूर क्रमांक १ ने केले. प्रस्तावना विकास सहयोग प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक ललेश कदम यांनी केली. या बैठकीला प्रतिष्ठानचे प्रकल्प समन्वयक वैभव कदम, वेलदूर शाळेचे मुख्याध्यापक गणेश विचारे, सुरेखा उडान, मंदार कानडे, पालशेत क्रमांक १ शाळेचे बाबासाहेब राशिनकर, धोपावे क्रमांक १ चे आनंद कदम, पालपेणे क्रमांक २ चे विकास पाटील, नवानगर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मनोज पाटील, वेलदूर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दीपश्री दाभोळकर, वेलदूर ग्रामपंचायतीच्या सदस्य दिव्या दाभोळकर, विकासदूत रोहिणी पड्याळ, विशाखा रोहिलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

090721\139-img-20210709-wa0005.jpg

शाळा व्यवस्थापन समितीचा सकारात्मक पुढाकार

शिक्षण क्षेत्रासाठी संकटमोचक - विजय कदम

Web Title: Positive initiative of school management committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.