ग्रामपंचायतींसाठी होणार आज मतदान

By Admin | Updated: April 22, 2015 00:23 IST2015-04-21T23:58:01+5:302015-04-22T00:23:09+5:30

प्रशासन सज्ज : ४ लाख १३ हजार मतदार हक्क बजावणार

Polling for Gram Panchayats today | ग्रामपंचायतींसाठी होणार आज मतदान

ग्रामपंचायतींसाठी होणार आज मतदान

रत्नागिरी : जिल्ह्यातील ३३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर अलसुरे (ता. खेड) येथील पोटनिवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान होणार आहे. यासाठी ४ लाख १३ हजार २४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्ह्यात जाहीर झालेल्या ४६१ पैकी १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ३३१ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान होणार आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेल्या ९० ग्रामपंचायतींमधील १५५९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने आता केवळ अलसुरे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठी दोन उमेदवार उभे आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या १८६५ जागांसाठी ३,९७१ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
जिल्ह्यातील ३३१ ग्रामपंचायतींसाठी ८८२ केंद्रावर मतदान होणार आहे. ४ लाख १३ हजार २४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी पुरुष १ लाख ९८ हजार ५४१ (४८ टक्के) इतके


निवडणूक लढविणाऱ्या ग्रामपंचायती (तालुकानिहाय)
तालुकाग्रामपंचायतमतदानउमेदवारमतदार
संख्या केंद्र
मंडणगड९२०७९४३०३७
दापोली३२८०३४५५८७४८
खेड६२१५४६६१७३२०९
चिपळूण५५१५१७०५२२५८८
गुहागर२१४८२११६०२३७
संगमेश्वर५०१३३५३४४१७६४
रत्नागिरी४२१४०७२६८९०१३
लांजा१६४०१९३१४६१६
राजापूर४४११४५०७१००३४
एकूण३३१८८१३,९७१४,१३,२४६




स्थानिक सुटी जाहीर
मतदान आज सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत होईल. ग्रामपंचायतीच्या निवडणुका नियोजित असलेल्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रापुरती स्थानिक सुटी जाहीर केली
आहे.

Web Title: Polling for Gram Panchayats today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.