पोलिसांच्या ताब्यातून चोरटा पळाला
By Admin | Updated: July 8, 2014 00:18 IST2014-07-07T23:52:27+5:302014-07-08T00:18:58+5:30
नालासोपारातील घटनेने खळबळ : शोधमोहिमेनंतर पकडण्यात यश

पोलिसांच्या ताब्यातून चोरटा पळाला
रत्नागिरी : चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताला नालासोपारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यास नेताना आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पलायन केले. प्रमोद देसाई असे संशयित आरोपीचे नाव आहे.
प्रमोदला नालासोपारा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. त्याला परत त्यांच्या स्वाधीन करण्यासाठी काल, रविवारी सकाळी नेण्यात येत असताना नालासोपारा येथेच ही घटना घडली. मात्र; जोरदार शोधमोहीम राबवत आज, सोमवारी दुपारी पोलिसांनी त्याला पकडले.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कारवांचीवाडी परिसरात २५ जून २०१४ रोजी चोरी झाली. याप्रकरणी दत्तात्रय शंकर देसाई यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांनी आपला नातू प्रमोद देसाई याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी त्याला रत्नागिरीत आणले होते. तपासानंतर ग्रामीणचे तीन पोलीस त्याला नालासोपारा पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी नेत होते. रविवारी सकाळी या संशयित आरोपीसह पोलीस नालासोपारा येथे पोहोचले. मात्र, प्रमोदने पोलिसांना गुंगारा देत पलायन केले होते. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. त्यात प्रमोद आज सोेमवारी सापडल्याने पोलिसांनी नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)