शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याकडेला आढळलेल्या 'त्या' नवजात अर्भकाच्या आईचा पोलिसांनी घेतला शोध, संबंधित महिलेस घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 19:23 IST

चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील एका दर्ग्याजवळ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ५ दिवसाचे नवजात अर्भक आढळून आले होते. या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात होता.

चिपळूण : चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील एका दर्ग्याजवळ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ५ दिवसाचे नवजात अर्भक आढळून आले होते. या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ तपास सुरू केला. तिन दिवसातच पोलिसांच्या प्रयत्नाला यश आले आहे. या नवजात बालकाच्या आईचा पोलिसांनी शोध घेतला असून आज, मंगळवारी तिला ताब्यातही घेतले.नववर्षाच्या स्वागताचा उत्साह सुरु असतानाच गुहागर बायपास रस्त्यावरील दर्ग्याजवळ स्त्री जातीचे अर्भक एका तरूणाला आढळले होते. या अर्भकाला तत्काळ कामथे रूग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. त्यानतंर दुसऱ्या दिवशी पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात नेऊन बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार केले. सद्यस्थितीत या नवजात बालकाची प्रकृती सुस्थितीत आहे. दुसरीकडे पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच तपासासाठी एका पथकाचीही नेमणूक केली होती. पोलिसांच्या या पथकातील पोलिस नाईक प्रणाली शिंदे यांना या बालकाच्या आई बाबतची काही गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार दोन दिवस पोलिस संबंधीत महिलेच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्यानुसार हे अर्भक संबंधीत महिलेचेच असल्याची खात्री पटताच मंगळवारी तिला ताब्यात घेतले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेचा तपास लावणाऱ्या पोलिस नाईक शिंदे यांच्या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी