शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुचाकी अपघातात पोलीस ठार, अन्य एक गंभीर जखमी, डंपर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 15:21 IST

नजीकच्या जालगाव येथे आज शनिवारी झालेल्या डंपर आणि दुचाकी अपघातात दुचाकीवरील पोलीस जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

दापोली   - नजीकच्या जालगाव येथे आज शनिवारी झालेल्या डंपर आणि दुचाकी अपघातात दुचाकीवरील पोलीस जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कमलाकर शिकरे असे या ठार झालेल्या पोलिसाचे नाव असून, ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गुळवड गावचे आहेत. अपघातातील दोघेही पोलीस रत्नागिरीतील पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी येत होते.

पोलीस भरतीसाठी रविवारी रत्नागिरीत लेखी परीक्षा असल्याने बंदोबस्तासाठी शिकरे (२९) आणि त्यांचे पोलीस सहकारी उदय मोनये (२६, राजापूर) शनिवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास निघाले. दाभोळमार्गे जवळचा रस्ता असल्याने ते दाभोळ-जयगडमार्गे रत्नागिरीला जायला निघाले. अवघ्या पाच मिनिट अंतरावर जालगांव ग्रामपंचायतीच्या पुढे गेल्यावर समोरून येणाऱ्या  डंपरला त्यांच्या दुचाकीचे हॅण्डल लागले व त्यांची दुचाकी पुढे असलेल्या पिकअप व्हॅनवर जाऊन आदळली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रोडवर पडले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. शिकरे यांना अतिरक्तस्राव  झाला होता. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यरांचे सहकारी उदय मोनये  यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. कमलाकर शिकरे यांच्या निधनाने दापोली पोलीस वसाहतीत शोककळा पसरली आहे. नाशिकहून त्यांचे कुटुंबीय दापोलीकडे येण्यासाठी निघाले आहेत. अपघाताची खबर डंपरचालक तुषार गुरव यांनी दिली आहे. दापोली पोलिसांनी डंपर (एमएच०८के/२०४२) ताब्यात घेतला आहे. नाशिकचे कमलाकर शिकरे वर्षभरापूर्वीच दापोली पोलीस स्थानकात आले आहेत. शिकरे यांच्या सोबत पत्नी व ७ महिन्याच्या दोन जुळ्या मुली दापोलीमध्ये राहत होत्या. गावाला त्यांची आई व वडील, विवाहीत बहीण असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी