शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अलोरे-शिरगांव रस्त्यावर वयोवृद्ध महिलेला लुटले, पोलिसांनी चोरट्यांना पाठलाग करून पकडले 

By संदीप बांद्रे | Updated: July 27, 2023 18:40 IST

चिपळूण : तालुक्यातील मुंढे येथील वयोवृद्ध महिलेला शिरगांवला सोडतो असे सांगून गाडीत बसवले आणि तिच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून ...

चिपळूण : तालुक्यातील मुंढे येथील वयोवृद्ध महिलेला शिरगांवला सोडतो असे सांगून गाडीत बसवले आणि तिच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून घेत मध्येच रस्त्यावर उतरवले. अलोरे शिरगांव रस्त्यावर बुधवारी भरदिवसा हा प्रकार घडला. याप्रकरणी शिरगाव पोलिस स्थानकात तक्रार होताच पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा कुंभार्ली घाटात पाठलाग करून चौघांना पकडून ९३ हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ जप्त केली.सूरज समाधान काळे (वय-२१), सरस्वती सूरज काळे (२१, दोघेही रा कुंभारी, उस्मानाबाद), राहुल अनिल शिंदे (३५), कामिनी राहुल शिंदे (३२, दोघेही रा. सारोळे, बार्शी, सोलापूर) या चार जणांना अटक केली आहे. अलोरे शिरगांव पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला. तालुक्यातील मुंढे येथील ६५ वर्षीय महिला बँकेत पेंशनची काही रक्कम काढण्यासाठी जात होती. त्यासाठी मुंढे बस थांब्यावर त्या उभ्या होत्या. शिरगांवकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना एक कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली व चालकाने तुम्हाला कुठे जायचे आहे, असे विचारून त्यांना गाडीत पुढे बसण्यास सांगितले. परंतु गाडीत पुरेशी जागा नसल्याचे सांगून त्यांच्या सोबत असलेल्या महिलेस गाडीमध्ये घेतले नाही. काही अंतरावर गेल्यावर गाडीमधील बसलेल्या एका महिलेने व तरुणाने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावून घेतली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिरगांव येथील ब्राह्मणवाडी जवळ त्यांना गाडीतून खाली उतरवले आणि ते निघून गेले. त्यानंतर वयोवृद्ध महिलेने एसटी बसने अलोरे शिरगांव पोलीस स्थानक गाठले. आपली तक्रार देऊन सदर गाडीचा नंबर १६५७ असल्याचे व यातील असणाऱ्या व्यक्तींचे वर्णन पोलिसांना सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करत संबंधित गाडीचा पाठलाग करून कुंभार्ली घाटामध्ये शिताफीने चोरट्यांना पकडले. या चारही जणांना पोलिसांनी अटक करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांची गाडीदेखील ताब्यात घेतली आहे. अलोरे पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत गडदे, पोलिस हवालदार गणेश नाळे, पोलिस शिपाई राहुल देशमुख व महिला होमगार्ड विजया चिपळूणकर यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी