शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलीस बंदोबस्त, नाक्यावरील दुभाजक खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 11:36 IST

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाची जनादेश यात्रा मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सायंकाळी रत्नागिरीत येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भव्य मंडप नागपूरच्या ...

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोलीस बंदोबस्त, नाक्यावरील दुभाजक खुले भाजपची महाजनादेश यात्रा आज रत्नागिरीत, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाची जनादेश यात्रा मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सायंकाळी रत्नागिरीत येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भव्य मंडप नागपूरच्या ठेकेदाराने उभारला असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. मारुती मंदिर येथे शिवाजी स्टेडियमकडे जाणाऱ्या नाक्यावरील दुभाजक खुले करण्यात आले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. आडिवरे, पावस, जयस्तंभ येथे जनादेश यात्रेचे जल्लोेषी स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री व जनादेश यात्रेच्या स्वागताचे फलक सर्वत्र झळकलेले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी मार्गातील अडथळे, खड्डे दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, महावितरण व पालिका प्रशासनाने या दौऱ्यासाठी पुरेशी काळजी घेतली आहे.जिल्ह्यात भाजपचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ठरणार आहे. कोकणच्या विकासाकरिताही त्यांनी अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे राज्यात पुन्हा फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता संपादन करण्यासाठी जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्ते चांगल्या प्रकारे योगदान देतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

जनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक सोमवारी रत्नागिरीत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीची सभा मोठ्या उपस्थितीने विक्रमी करूया, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा स्वागताध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी या बैठकीत केले. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्षम, लोकाभिमुख प्रशासन दिले. राजकीय प्रश्न, शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठा आंदोलन असे सर्व प्रश्न कार्यकुशलतेने सोडवले. याकरिता कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठबळ दिले पाहिजे.यावेळी महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनीही मार्गदर्शन केले. या सभेला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक कदम, डॉ. अलिमियॉ परकार, मुन्ना सुर्वे, जयंत देसाई, अ‍ॅड. प्रदीप नेने, सीए भूषण मुळ्ये, सीए श्रीरंग वैद्य, अ‍ॅड. विजय साखळकर, प्रवीण लाड, राजन मलुष्टे, अ‍ॅड. फजल डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राRatnagiriरत्नागिरीBJPभाजपा