राजापूर-धाऊलवल्ली रस्त्याची दुर्दशा, पुलाचे काम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:51+5:302021-06-17T04:21:51+5:30
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. सध्या या रस्त्यावर पूल, गटार आणि संरक्षक भिंती उभारण्याचे काम ...

राजापूर-धाऊलवल्ली रस्त्याची दुर्दशा, पुलाचे काम अर्धवट
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. सध्या या रस्त्यावर पूल, गटार आणि संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरु आहे. खोदाईमुळे माती तशीच रस्त्याकडेला ठेवण्यात आली आहे. पावसामुळे ती रस्त्यावर आली असून, संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे.
दरम्यान, काम सुरु असतानाही रस्ता बंद करण्यात आलेला नाही. तसेच या रस्त्यावर काम सुरु असल्याचा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुलाचे काम अर्धवट आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात जुन्या रस्त्यावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे रस्ता बंद झाल्याने अनेकांना वळसा घालून पुढे जावे लागले. काही ठिकाणी जाड खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी घसरत आहेत. या मार्गावरुन जाणाऱ्यांना जीव मुठीत धरुनच प्रवास करावा लागत आहे.
संबंधित विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका येथील ग्रामस्थांना बसत आहे. राजापूर तहसील प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने यात तत्काळ लक्ष घालून रस्ता सुस्थितीत करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.