शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

रत्नागिरीतील काजळी नदी संवर्धनासाठी हजार वृक्षांची लागवड

By शोभना कांबळे | Updated: August 29, 2023 18:23 IST

चला जाणुया नदीला अभियानांअतर्गत वृक्षारोपण मोहीम यशस्वी 

रत्नागिरी : जिल्हा प्रशासन समिती सदस्य, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्राम पंचायत येरवंडे कणगवली, मौजे येरवंडे महादेव देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला जाणुया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.काजळी नदी संवर्धनासाठी गेल्या वर्षापासून विविध जलप्रेमी व्यक्ती, संस्था प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘चला जाणुया नदीला’ आणि ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत काजळी नदी पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत वनविभागाकडून पुरविण्यात आलेली शिवण, बहावा, हरडा, हेला, आवळा, जांभूळ, रिंगी, मोहगणी, दालचिनी, आटकी, करंज, पेरू, बेल,साग, लिंबू, शमी, राताबी, गुलमोहर आदींची एक हजार रोपे गावातील रस्त्यांच्या दुतर्फा आणि देवराई येथे लावण्यात आली.या अभियानात काजळी नदी प्रहरी जिल्हा समिती सदस्य समन्वयक अनिल कांबळे, समन्वयक रोहन इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ राहुल मराठे, डॉ. महादेव बडगे, प्रा. अवंतिका केळुस्कर, प्रा. अनुप्रिया प्रभू, प्रा. कदम, वनपाल आरेकर, वनरक्षक सूरज तेली, तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ९० विद्यार्थी, येरवंडे गावचे ग्रामस्थ या अभियानात सहभागी झाले. या सर्व उपक्रमाला लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए एस कुलकर्णी तसेच उपप्राचार्य डॉ. के आर चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.चला जाणुया नदीला अभियानात काजळी नदी तीरावरील महसूल गावातून वृक्षारोपण करून नदी काठाचे तसेच डोंगर भागातील धूप थांबविणे, पाणलोट क्षेत्रात भूजल पाणी साठा वाढवणे, फूड फॉरेस्ट संकल्पनेतून वन्य प्राण्यांना विस्थापनापासून थांबवणे, पर्यावरण संवर्धन या हेतुने सर्व पर्यावरप्रेमीं ग्रामस्थांनी वृक्षारोपणाची ही मोहीम यशस्वी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदी