महामार्गावरील खड्ड्यात केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:04+5:302021-07-20T04:22:04+5:30
चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून गुहागर-कऱ्हाड महामार्गावर शहरातील बहादूरशेखनाका येथे भलामोठा खड्डा पडला असून, त्यामध्ये काही वाहने अडकून पडत ...

महामार्गावरील खड्ड्यात केले वृक्षारोपण
चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून गुहागर-कऱ्हाड महामार्गावर शहरातील बहादूरशेखनाका येथे भलामोठा खड्डा पडला असून, त्यामध्ये काही वाहने अडकून पडत आहेत. हा खड्डा वाहतूकदारांच्या लक्षात यावा, यासाठी काही नागरिकांनी खड्ड्यातच वृक्षारोपण केले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर खड्ड्यांतील चिखलमय पाणी अंगावर उडत आहे. आता गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे. परंतु तोपर्यंत प्रवाशांना खड्ड्यातच प्रवास करावा लागणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ कधी संपणार, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.
अशातच आता कऱ्हाड मार्गावरही खड्डे निर्माण झाल्याने वाहतूकदार हैराण झाले आहेत. या मार्गावरील बहादूरशेख नाका ते पिंपळी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, बहादूरशेख नाका येथे क्वाॅलिटी बेकरीसमोर भलामोठा खड्डा पडला आहे. या रस्त्याचे काम मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीने अनेकांनी या कंपनीकडे संपर्क साधून हा खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना पाचशे रुपयांचा दंड केला जातो. मात्र अपघातास कारणीभूत ठरत असणाऱ्या रस्त्याप्रकरणी ठेकेदारावर फौजदारी कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-----------------------
गुहागर-कऱ्हाड महामार्गावर शहरातील बहादूरशेखनाका येथे खड्ड्यातच वृक्षाराेपण करण्यात आले.
190721\172-img-20210719-wa0023.jpg
महामार्गावरील खड्ड्यात केले वृक्षारोपण