नियोजन समितीची मंगळवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:06+5:302021-08-21T04:36:06+5:30
रत्नागिरी : पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात ...

नियोजन समितीची मंगळवारी बैठक
रत्नागिरी : पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डाॅ. बी. एन. पाटील यांनी कळविले आहे.
वंचितची आज बैठक
रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण जिल्हा कमिटीतर्फे रत्नागिरीतील अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२.३० वाजता ही बैठक होणार असून, त्यात जिल्हाध्यक्ष निवडीबाबत चर्चा केली जाणार आहे.
कविता संग्रहाचे प्रकाशन
राजापूर : कवी रविकुमार जाधव यांच्या ‘माझी शाळा’ या दुसऱ्या बाल कविता संग्रहाचे प्रकाशन विश्व समता कलामंच या संस्थेच्यावतीने करण्यात आले. त्यांचा ‘स्वप्न’ हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. त्याला राज्यस्तरीय दोन पुरस्कार मिळाले आहेत.
कोळंबी प्रकल्पांना मंजुरी
रत्नागिरी : सागरी मत्स्य उत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याने गोड्या पाण्याच्या कोळंबीसह अन्य जातीच्या मत्स्य संवर्धनाला चालना दिली जात आहे. रत्नागिरीत ४० कोळंबी प्रकल्पांना परवानगी देण्यात आल्याने वर्षभरात १०० टन उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
पूरग्रस्तांना मदतीचे वाटप
चिपळूण : मुंबईतील दीप जनसेवा समितीतर्फे मार्गताम्हाने, आंबेरे, उमरोली व वाघिवरे या चार गावांमध्ये जीवनावश्यक वस्तू व कपड्यांचे वाटप करण्यात आले. या समितीच्या उपक्रमाबद्दल पूरग्रस्तांनी धन्यवाद देत कृतज्ञता व्यक्त केली.
खड्डे भरण्यास प्रारंभ
राजापूर : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर अतिवृष्टीमुळे खड्डे पडले असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या महामार्गाच्या दुरूस्तीबाबत वरिष्ठ स्तरावरून आदेश आल्याने सध्या या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.