नवीन बाजारपुलावरील खड्डा बनलाय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST2021-09-12T04:36:48+5:302021-09-12T04:36:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : येथील नवीन बाजारपुलावर भलामोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे येथील वाहतूकदार हैराण झाले आहेत. ...

नवीन बाजारपुलावरील खड्डा बनलाय धोकादायक
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथील नवीन बाजारपुलावर भलामोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे येथील वाहतूकदार हैराण झाले आहेत. वारंवार एकाच ठिकाणी खड्डा पडत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
चार वर्षांपूर्वी नवीन बाजारपुलाचे लोकार्पण करण्यात आले. या पुलाचे काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त बनले होते. न झालेल्या कामासाठी सुमारे ८० लाख रुपये खर्च दाखवल्याने त्याच्या वसुलीचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र अद्याप ही वसुली झालेली नाही. आता याच पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या मध्यभागी एक भलामोठा खड्डा पडला आहे. आतापर्यंत तीन वेळा हा खड्डा काँक्रिटीकरणाने बुजविण्यात आला. मात्र, आता पुन्हा त्याच ठिकाणी खड्डा पडला आहे.
दिवसेंदिवस या खड्ड्याच्या ठिकाणी असलेल्या काँक्रिटीकरणातील लोखंडी सळ्यांचा धोका वाढत चालला आहे. वाहतूकदारांच्या दृष्टीने हा खड्डा धोकादायक ठरू लागला आहे. त्यासाठी नगर परिषदेने या खड्ड्याच्या ठिकाणी वेळीच कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.