फिलॉसॉफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST2021-08-21T04:35:57+5:302021-08-21T04:35:57+5:30
आता दुसरे एक उदाहरण, आमचे एक पाहुणे मरणाच्या दारात होते. तुम्ही आता जिवंत राहणार नाही हे स्पष्ट कसं ...

फिलॉसॉफी
आता दुसरे एक उदाहरण, आमचे एक पाहुणे मरणाच्या दारात होते. तुम्ही आता जिवंत राहणार नाही हे स्पष्ट कसं सांगायचं, म्हणून डाॅक्टर म्हणाले, ‘राजाभाऊ तुम्ही यावेळी ८४ दिवसांचा मोबाईल रिचार्ज पॅक मारू नका तर २४ दिवसांचाच मारा.’ आता राजाभाऊ पडले गरीब. डॉक्टरांचे बोलणे त्यांना समजलं नाही आणि खरंच ते २४ दिवसांच्या आत गेले. आता याला काय म्हणावे? तसे बंडोपंत खासगीत म्हणाले, आपण कोणाकोणाला ओरडून सांगणार, तुम्ही प्रामाणिक रहा म्हणून. यावर एकमेव उपाय म्हणजे आपण स्वतःच प्रामाणिक राहायचं. जग काय करतं तिकडे लक्ष द्यायचं नाही. भले आपल्यावर काहीही संकट येवो आपण स्थिर राहायचं. बंडोपंतांची ही फिलॉसॉफी ऐकून इतका आनंद झाला की विचारायची सोय नाही. मग आम्ही म्हणालो, ‘विचार करून करून उगाच डोकं दुखून गेलं होतं. आता फ्रेश वाटतं.’ मग आम्ही उगाचच आग्रह करून म्हणालो, ‘बंडोपंत थोडा तरी चहा घेऊन जा.’ तसे बंडोपंत उठत म्हणाले, ‘त्याचं काय आहे, आमच्याकडे एक पाहुणे येणार आहेत तेव्हा त्यांना चहा होईलच. तेव्हा माझापण होईल. कशाला त्रास वहिनीसाहेबांना?’ बंडोपंत थोडा वेळ बसले आणि चालते झाले. आम्ही आपले बंडोपंतांच्या अजब फिलॉसॉफीला मनोमनी सलाम करून उद्यापासून दुधवाला बंद नाही करायचा ठरवून उठलो.
- डॉ. गजानन पाटील