पाळीव जनावरांची तस्करी करणारे रॅकेट पकडले
By Admin | Updated: December 15, 2015 00:53 IST2015-12-14T22:27:30+5:302015-12-15T00:53:45+5:30
दोघांना अटक; तिघे फरार : कोयनानगर येथे कारवाई

पाळीव जनावरांची तस्करी करणारे रॅकेट पकडले
कोयनानगर : चिपळूणहून कऱ्हाडकडे कत्तलखाण्याच्या उद्देशाने पाळीव जनावरांची तस्करी करणारे रॅकेट कोयनानगर येथे रविवार रात्री मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कोयना पोलिसांनी तस्करी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा नोंद केला असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून तिघे फरार झाले आहेत. दरम्यान, तस्करी केलेल्या पाळीव जनावरांना कराड करवडी येथील कृष्णा गोपालन संस्थेमध्ये सोडले आहे.़
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार, दि़ १३ रोजी रात्री दहा वाजता चिपळूणकडून कऱ्हाडकडे जाणारा ट्रक (एमएच०८ एच००६९) हा वेगाने निघाला असल्याचा संशय मनसेचे विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे यांना आला असता त्यांनी दास्तन येथील टोलनाक्याजवळ ट्रक अडवून चौकशी केली असता या ट्रकमध्ये १६ बैल आढळून आले़ त्यांनी तातडीने हा ट्रक कोयना पोलिसांच्या ताब्यात दिला. गत सप्ताहात याच ठिकाणी पाळीव जनावरांची तस्करी करणारे तीन टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊनही पाळीव जनावरांची तस्करी थांबली नसल्यामुळे या प्रकरणाला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप मनसे विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे यांनी केला़ ही घटना समजताच विविध संघटनानंी कोयनानगर पोलीस ठाण्यात गर्दी केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता़ याप्रकरणी इमरान खेरटकर (वय २५), समसुद्दीन इस्माल खेरटकर (वय ३२, दोघेही रा़ रा़ खिर्डी, ता़ चिपळूण) यांना अटक करण्यात आली असून महम्मद बेलेकर, ट्रकमालक हुसेन खेरटकर व फारूक (पोलिसांना संपूर्ण नाव समजू शकले नाही.) हे फरार आहेत़ या सर्वांवर प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. हवालदार दत्तात्रय डिसले तपास करत आहे़ (वार्ताहर)