पुण्याच्या लोकोपयोगी आयुर्वेद कंपनीला दंड

By Admin | Updated: July 22, 2015 23:57 IST2015-07-22T22:17:59+5:302015-07-22T23:57:47+5:30

वृध्द महिलेला लाभ : रत्नागिरीच्या ग्राहक मंचाचा निर्णय

Penalty for Pune's Ayurveda Company | पुण्याच्या लोकोपयोगी आयुर्वेद कंपनीला दंड

पुण्याच्या लोकोपयोगी आयुर्वेद कंपनीला दंड

रत्नागिरी : धार्मिक व संस्कृ ती पर्यटन कें द्र करुन देण्याच्या बहाण्याने रक्कम उकळून नंतर फसवणूक करणाऱ्या लोकोपयोगी आयुर्वेद कंपनी, पुणे या कंपनीला ९३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यामुळे गुहारमधील वृद्ध महिलेला लाभ मिळाला आहे.
गुहागर चिखली येथील सुरेखा प्रकाश गोडांबे (६५) यांनी पुणे येथील लोकोपयोगी आयुर्वेद प्रा. लि., पुणे संचालक अण्णासाहेब सुखदेव म्हस्के यांच्याविरोधात रत्नागिरी येथील जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली होती.
औषधी वनस्पतींची लागवड आणि आयुर्वेदिक वनस्पतींचे आरोग्य, धार्मिक, संस्कृती पर्यटन केंद्र करुन देण्याच्या बहाण्याने पुणे येथील लोकोपयोगी आयुर्वेद प्रा. लि.चे संचालक म्हस्के यांनी गोडांबे यांच्याकडून २७ जुलै १४ रोजी रकमेची मागणी करुन रक्कम स्वीकारली होती व ६ ते ७ महिन्यांच्या कालावधीत सुरेखा गोडांबे यांचे जमिनीमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करुन देतो, शास्त्रज्ञ मातीचा नमूना घेऊन परीक्षण करतील, तसेच कृ षी पर्यटन केंद्र सुरु करुन देतो, देशविदेशातील पर्यटक तुमच्या जमिनीमध्ये भेट देतील अशी स्वप्न दाखवून सहा महिन्यांच्या कालावधीत एक ते दीड लाख रुपये नफा मिळवून देतो, असे आमिष कंपनी संचालक म्हस्के यांनी वृद्ध महिला गोडांबे यांना दिले होते. त्यानंतर गोडांबे यांच्याकडून रक्कम स्वीकारल्यानंतर या आयुर्वेद कंपनीचे आश्वासनाप्रमाणे कोणतीही कारवाई केली नाही.
या बाबीने व्यथित होऊन अखेर गोडांबे यांनी रत्नागिरी येथील त्यांचे वकिल अ‍ॅड. मनिष चंद्रकांत नलावडे यांच्यामार्फ त रत्नागिरी येथील जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार १३ जुलै १५ रोजी दाखल केली होती.
लोकोपयोगी आयुर्वेद प्रा. लि.चे संचालक म्हस्के यांच्याविरोधात सबळ पुरावा देण्यात येऊन तक्रारदार यांचे वकील अ‍ॅड. मनीष नलावडे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्षा पळसुले व सदस्य नाईकवडे यांच्या न्यायालयाने कंपनीचे ंसंचालक म्हस्के यांनी गोडांबे यांची फसवणूक केल्याने ८० हजारांची नुकसानभरपाई रक्कम घेतल्या दिनांकापासून ९ टक्के व्याजासह देण्याचे तसेच १० हजार रुपये मानसिक व शारीरिक त्रासापोटी द्यावेत, असा आदेश दिला आहे.
तसेच गोडांबे यांनी तक्रार करण्यास भाग पाडून खर्चात पाडल्याबद्दल ३ हजार रुपये ४५ दिवसांचे आत देण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)

औषधी वनस्पतीच्या लागवडीसह धार्मिक, संस्कृती पर्यटन केंद्र उभारण्याचे दिले होते आश्वासन.
संचालकांनी वृध्द महिलेकडून रक्कम उकळली.
सहा महिन्यात एक ते दीड लाखांचा नफा मिळवून देण्याचेही दिले होते आश्वासन.

Web Title: Penalty for Pune's Ayurveda Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.