दुचाकीच्या धडकेने पादचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST2021-04-09T04:33:37+5:302021-04-09T04:33:37+5:30

चिपळूण : वाहतुकीचा परवाना नसताना दुचाकी भरधाव वेगाने चालवून एका पादचाऱ्यास धडक देऊन त्याला जखमी केल्याची घटना डेरवण ते ...

Pedestrian injured in two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेने पादचारी जखमी

दुचाकीच्या धडकेने पादचारी जखमी

चिपळूण : वाहतुकीचा परवाना नसताना दुचाकी भरधाव वेगाने चालवून एका पादचाऱ्यास धडक देऊन त्याला जखमी केल्याची घटना डेरवण ते सावर्डे रस्त्यावर काही दिवसांपूर्वी घडली आहे. या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय जयराम धावडे (३२, रा. सावर्डे-काजरकोंडवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

या अपघातात लक्ष्मण विठ्ठल कातकर (६२, रा. सावर्डे-काजरकोंड) हे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद सुरेंद्र सदाशिव कदम (सावर्डे पोलीस स्थानक) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धावडे याच्याकडे दुचाकी चालवण्याचा परवाना नसताना तो ४ एपिल रोजी आपल्या ताब्यातील दुचाकी काजरकोंड ते डेरवण-हडकणी फाटा असे सावर्डे रस्त्याने बेदरकारपणे चालवत हाेता. डेरवण ते सावर्डे रस्त्यावर कातकर हे चालत जात असताना धावडे याने त्यांना धडक दिली. यात ते जखमी झाले आहेत.

Web Title: Pedestrian injured in two-wheeler collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.