संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षपदी पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:36 IST2021-09-15T04:36:14+5:302021-09-15T04:36:14+5:30
खेड : सेवानिवृत्त केंद्रप्रमुख व पंधरागाव भागातील रहिवासी तुळशीराम पवार यांची मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड ...

संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षपदी पवार
खेड : सेवानिवृत्त केंद्रप्रमुख व पंधरागाव भागातील रहिवासी तुळशीराम पवार यांची मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पवार यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जिल्हा उपाध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
ज्ञानदीपमध्ये चर्चासत्र
खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे - बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात एक दिवसीय ऑनलाइन चर्चासत्र नुकतेच पार पडले. प्राचार्य डॉ. चौधरी, प्राचार्य अश्विनी लेले यांनी विद्यार्थ्यांना या वेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्था सरचिटणीस प्रकाश गुजराती यांच्यासह संस्थेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. प्राध्यापक वैशाली राणे यांनी या वेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
दिव्यांगांसाठी शिबिर
खेड : जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना सर्वच खेळात संधी मिळवून देण्यासाठी दिव्यांग क्रिकेट असोसिएशन व पँरा स्पोर्ट्स अकॅडमी या जिल्हा संघटनेच्या वतीने क्रीडा मार्गदर्शक व सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंच्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महिला व पुरुष गटातील सर्व खेळाडूंना सर्व खेळांची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रशांत सावंत - खेड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.