वर्षभर बंद असणारे राजापुरातील पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST2021-06-29T04:22:05+5:302021-06-29T04:22:05+5:30

राजापूर : तळकोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांसाठी असलेले राजापुरातील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या ...

Passport office in Rajapur, which was closed for a year, reopened | वर्षभर बंद असणारे राजापुरातील पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू

वर्षभर बंद असणारे राजापुरातील पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू

राजापूर : तळकोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांसाठी असलेले राजापुरातील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे ५१ नागरिकांनी पासपोर्ट कार्यालयात येऊन पासपोर्टची नोंद केली आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून व रत्नागिरी, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना सोयीस्कर ठरेल असे पासपोर्ट सेवा केंद्र राजापूर पोस्ट कार्यालयात सुरू केले होते. मागील कालावधीत दोन जिल्ह्यांतील नागरिकांनी या सेवा केंद्राच्या माध्यमातून पासपोर्ट काढले आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे यापूर्वी प्रदीर्घकाळ हे सेवाकेंद्र बंद होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू झाल्यावर नागरिकांनी आपापल्या पासपोर्टची नोंद केली होती. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाउन लावण्यात आले होते. त्यामुळे येथील पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा बंद होते. गेल्या २३ जूनपासून ते पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या पाच दिवसांत जवळपास ५१ नागरिकांनी पासपोर्टसाठी अर्ज केले असल्याची माहिती या केंद्राकडून देण्यात आली.

Web Title: Passport office in Rajapur, which was closed for a year, reopened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.