दापचरी नाक्यावर ‘पासिंग’ टोळ्या
By Admin | Updated: September 3, 2015 23:08 IST2015-09-03T23:08:21+5:302015-09-03T23:08:21+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्र. ८ वरील व गुजरात-महाराष्ट्र हद्दीवरील दापचरी तपासणी नाक्यावर स्थानिक तसेच परप्रांतिय पासिंग टोळ्यांचे थैमान सुरु आहे.

दापचरी नाक्यावर ‘पासिंग’ टोळ्या
टेंभ्ये : राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेल्या संचमान्यता आदेशाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने जाहीर निषेध केला आहे. संचमान्यतेचा शासन निर्णय व शिक्षणमंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्याविरोधी राज्यभर आत्मक्लेष आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून महामंडळाने कृती कार्यक्रम निश्चित केला आहे.दि. २८ आॅगस्ट रोजी राज्य शासनाने संचमान्यतेबाबतचे निकष शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास राज्यात असंख्य शाळांची मुख्याध्यापक पदे धोक्यात येणार आहेत. माध्यमिक शाळांमध्ये ९०पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास त्या शाळेचे मुख्याध्यापक पद रद्द करुन संबंधित मुख्याध्यापकाला सहाय्यक शिक्षकाचे काम करावे लागणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांशिवाय चालवाव्या लागणार आहेत. या शासन निर्णयानुसार तुकडी पद्धत बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकदेखील अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शासन निर्णयाचा महामंडळाच्या दि. ३ सप्टेंबरच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये निषेध करण्यात आला.राज्याच्या विधी मंडळ सभागृहात शिक्षणमंत्र्यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. मुख्याध्यापकांना तुरुंगात टाकू, हे शिक्षणमंत्र्यांचे वक्तव्य त्यांनी मागे न घेतल्यास ५ सप्टेंबर रोजी जाहीर निषेध म्हणून दिवसभर कडकडीत उपवास करुन राज्यातील सर्व मुख्याध्यापक ‘आत्मक्लेष’ करणार आहेत. या दिवशी २८ आॅगस्टच्या शासन निर्णयाची शाळांमधून होळी करण्यात येणार आहे. तसेच काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महामंडळाने निश्चित केलेल्या कृती कार्यक्रमाची १०० टक्के अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणाच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभे केले जाणार आहे. संचमान्यतेच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यासंदर्भात महामंडळ विचार करत आहे.