पॅसेंजरची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST2021-09-02T05:08:02+5:302021-09-02T05:08:02+5:30
मार्गदर्शन शिबिर मंडणगड : ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान, कोकण विकास युवा मंच व आंबडस ग्रामस्थ विकास मंच यांच्या संयुक्त ...

पॅसेंजरची मागणी
मार्गदर्शन शिबिर
मंडणगड : ९६ कुळी मराठा प्रतिष्ठान, कोकण विकास युवा मंच व आंबडस ग्रामस्थ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा शिबिरासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश येडगे, आरोग्य अधिकारी दीपक मोरे उपस्थित होते.
दंड वसूल
रत्नागिरी : शहरातील रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांपैकी कोंडवाड्यात असलेल्या ४५ जनावरांना विश्व हिंदू परिषदेच्या देवरुख येथील गो-शाळेत पाठविण्यात आले आहे. उर्वरित ११ जनावरे मालकांना दंड भरून परत करण्यात आली. प्रती गुरांमागे १,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
पालक प्रबोधन चर्चासत्र
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित विद्याभारती शिशुवाटिका व प्राथमिक विभागात नुकतेच कोरोना समज-गैरसमज व मुलांचे आरोग्य संगोपन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. डॉ. उमेश रेवाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. समीर परांजपे यांनी कोरोनाविषाणू व उपाययोजना याबाबत माहिती दिली.
ऑनलाईन स्पर्धा
राजापूर : कोकण कलामंच प्रस्तुत अखिल भारतीय माजी नाट्य संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर पुरस्कृत १८ वर्षावरील खुली राज्यस्तरीय एकपात्री मालवणी बोली भाषा अभिनय नाट्य ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा शुभारंभ २० सप्टेंबरपासून होणार असून स्पर्धेेच ऑनलाईन व्हिडिओ ४ ऑक्टोबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.