हट्टीपणा वाढल्यामुळे पालकांचा आरडाओरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST2021-08-23T04:33:54+5:302021-08-23T04:33:54+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे मुले गेले दीड वर्ष घरी आहेत. अध्यापनाबरोबर खासगी शिकवणी असो वा अन्य ...

Parents' outcry over stubbornness | हट्टीपणा वाढल्यामुळे पालकांचा आरडाओरडा

हट्टीपणा वाढल्यामुळे पालकांचा आरडाओरडा

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे मुले गेले दीड वर्ष घरी आहेत. अध्यापनाबरोबर खासगी शिकवणी असो वा अन्य कलेचे वर्गही ऑनलाईन सुरू आहेत. दिवसभरातील बहुतांश वेळ मोबाईल/संगणकासमोरच मुले आहेत. खेळायलाही बाहेर पालक पाठवीत नसल्यामुळे मोबाईलवरच खेळ रंगत आहे. यामुळे मुले एकलकोंडी बनली असून, त्यांच्यामध्ये हट्टीपणा, चिडचिडेपणा वाढला आहे. मुले ऐकत नसल्यामुळे पालकांचा मनस्ताप वाढत असून, आरडाओरडाही होऊ लागला आहे.

सूज्ञ पालक मात्र पाल्यांशी संवाद साधून मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी मार्ग शोधत आहेत. मुलांबरोबर खेळामध्ये रममाण होत असून, त्यांचा कंटाळा दूर करीत आहेत.

पहिली १०५५८

दुसरी १२३०३

तिसरी १२३८४

चाैथी १२६४१

पाचवी ११३१७

सहावी १२१०५

सातवी १२२९३

आठवी २१७८४

नववी २२५७९

दहावी २३३२८.

मुलांच्या समस्या

n ऑनलाईन अभ्यासाला कंटाळली

n एकलकोंडेपणा वाढला

n घरात संवाद झाला कमी

n मोबाईलवरील गेम झाला आवडीचा

n शाळेबाबतची उत्सुकता कमी झाली

पालकांच्या समस्या

n दिवसभरातील जास्त वेळ मोबाईलवरच

n ऐकत नाहीत

n हट्टीपणा वाढला

n लेखनाचा कंटाळा

n सर्वांबरोबर सहभागी होण्यामध्ये अनुत्सुकता

मानसाेपचार तज्ज्ञ म्हणतात...

बदलत्या परिस्थितीत ऑनलाईन अध्यापनाचा मार्ग अवलंबावा लागला तरी मुलांना आकलन कितपत होत आहे, हा प्रश्नच आहे. मुलांच्या वर्तनात बदल झाला असून, हट्टी, चिडचिडेपणा वाढला आहे. मुलांना समजून घेत घरात आनंददायी वातावरण ठेवणे गरजेचे आहे.

- डॉ. सचिन सारोळकर, मानसोपचारतज्ज्ञ

जग इंटरनेटमुळे जवळ आले असून, अभासी मित्र वाढले आहेत. तुलनेने आठवी ते दहावीच्या मुलांबाबत समस्या वाढल्या आहेत. वाईट किंवा आकर्षणाकडे मुले झुकत आहेत का याबाबत पालकांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. मुलांना बाह्य आकर्षणापासून रोखण्यासाठी संवाद वाढविणे आवश्यक अहे.

डॉ. समीर जमादार, मानसोपचारतज्ज्ञ

Web Title: Parents' outcry over stubbornness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.