शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटातील कामाला आचारसंहितेमुळे लागला ‘ब्रेक’; संरक्षक भिंत नव्याने उभारण्याचा प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 19:12 IST

संदीप बांद्रे चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत काेसळल्याच्या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक एकेरीच सुरू आहे. ...

संदीप बांद्रेचिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत काेसळल्याच्या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक एकेरीच सुरू आहे. संरक्षक भिंत व काँक्रिटीकरणासाठी मजबुतीकरणाचा प्रस्ताव नव्याने तयार करण्यात आला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू केले जाणार आहे. मात्र, विधानसभेच्या आचारसंहितेमुळे हे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तातडीची बाब म्हणून याला मान्यता देण्याची मागणी केली जाणार आहे.परशुराम घाटात एकीकडे दरड कोसळण्याच्या, तर दुसरीकडे रस्ता खचण्याची भीती असल्याने येथे ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग विभागाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या घाटातील ४० मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. १६ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून, त्यावेळेपासून घाटातील एकेरी मार्ग बंद ठेवला आहे.परशुराम घाटातील दरडीच्या बाजूकडील महामार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘टीएचडीसीएल’ संस्थेचा सल्ला घेतला जात आहे. तूर्तास संरक्षक भिंत कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने आरसीसी संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे.

गेले आठ-दहा दिवस येथे सातत्याने पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. घटनास्थळी अजूनही धोका टळलेला नाही. संरक्षण भिंतही कोसळलेल्या ठिकाणी भरावाची माती हळूहळू घसरत आहे. त्यामुळे येथे अजूनही बंदोबस्त ठेवून लक्ष ठेवण्यात आले आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने निविदा प्रक्रियेत अडचणी येत आहे.

परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी नव्याने संरक्षक भिंत उभारून कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे. तातडीने त्याचा प्रस्ताव तयार करून निविदा प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच तडे गेलेले काँक्रिटीकरण काढून नव्याने काम केले जाणार आहे. -पंकज गोसावी, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी