कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पन्हाळजे - बौद्धवाडी ‘सील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST2021-07-20T04:22:03+5:302021-07-20T04:22:03+5:30

खेड : तालुक्यातील पन्हाळजे - बौद्धवाडीत आढळलेल्या २७ कोरोनाबाधित रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेची धावाधाव सुरू झाली आहे. ही वाडी आरोग्य ...

Panhalje - Buddhist 'seal' due to increasing corona infection | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पन्हाळजे - बौद्धवाडी ‘सील’

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पन्हाळजे - बौद्धवाडी ‘सील’

खेड : तालुक्यातील पन्हाळजे - बौद्धवाडीत आढळलेल्या २७ कोरोनाबाधित रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेची धावाधाव सुरू झाली आहे. ही वाडी आरोग्य प्रशासनाने सील केली असून, तातडीने सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. याठिकाणी कोरोना नियंत्रणात येईपर्यंत सर्वेक्षणाची मोहीम सुरूच राहणार असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

पन्हाळजे - बाैद्धवाडीमध्ये ९२ लोकवस्ती आहे. या वाडीतील तब्बल २७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याठिकाणी दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण आढळत असल्याने हे गाव कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, पन्हाळजे - बौद्धवाडीत एकाचवेळी आढळलेल्या २७ कोरोनाबाधितांमुळे आरोग्य यंत्रणेची धास्ती वाढली आहे. या २७ रूग्णांमध्ये ३ रूग्ण १४ वर्षापर्यंतच्या वयोगटातील आहेत. शुक्रवारपासून वाडीत सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. घराेघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पन्हाळजे - बौद्धवाडीपाठोपाठ ऐनवरेतही कोरोनाचा संसर्ग वाढत असून, याठिकाणीही आरोग्य यंत्रणेने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

Web Title: Panhalje - Buddhist 'seal' due to increasing corona infection