पालशेत पूल डागडुजीनंतर वाहतुकीसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:33+5:302021-08-14T04:37:33+5:30
गुहागर : तालुक्यातील पालशेत बाजार पुलाचे दोन खांब कमकुवत झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवत १४ जुलैपासून बांधकाम विभागाने ...

पालशेत पूल डागडुजीनंतर वाहतुकीसाठी खुला
गुहागर : तालुक्यातील पालशेत बाजार पुलाचे दोन खांब कमकुवत झाल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवत १४ जुलैपासून बांधकाम विभागाने बंद ठेवला होता. डागडुजीनंतर तब्बल महिनाभरानंतर आता हा पूल वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आला आहे.
पालशेत पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने अवजड वाहनांना शृंगारतळी तसेच पालशेत बारभाईमार्गे जावे लागत होते. गुहागर एस. टी. सेवा पालशेतपर्यंतच सुरू होती; तर पुलापलीकडील बोऱ्या कारुळ आधी गावांना जाण्यासाठी शृंगारतळीमार्गे एकमेव एस. टी. फेरी सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे एस. टी. प्रवासी तसेच शृंगारतळी गुहागर येथे बाजार खरेदी तसेच शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने पाहणी करून पाणी कमी झाल्यानंतर तातडीने डागडुजी सुरू करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. याप्रमाणे बांधकाम विभागाच्या उपअभियंता सलोनी निकम यांनी लगेचच या कामाला सुरुवात करून फुलाचे तीन खांबांची प्रत्यक्ष पाहणी करून डागडुजीला सुरुवात केली.
कनिष्ठ अभियंता प्रसाद घोरपडे यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू होते. यानंतर प्रभारी कार्यकारी अभियंता जठार यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे परवानगी दिली. त्यानंतर आता पालशेत फूल पुन्हा एकदा महिनाभरानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.