ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
नूल (ता. गडहिंग्लज) येथे लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी तसेच ट्रॅक्टरवर टेपरेकॉर्डर लावणेस बंदी घालण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या गावसभेत घेण्यात आला. ...
शासनाने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना चांगली असली तरी त्याचा ताण सीपीआरमधील प्रसूती विभागावर पडत आहे. प्रत्येक तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांवर उपचार करण्यास चालढकल केली जात आहे. ...