आपण शिवसेनेकडून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त खोडसाळ व गैरसमज निर्माण करणारे आहे. आपण राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहोत त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढविणार असल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी लोकमतला दिली. ...
खेर्डी येथील विनोद भुरण यांच्या कातळवाडी येथील क्वारीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये मगर आढळली. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला पकडले. ही मगर मादी जातीची होती. तिचे वय १ वर्ष तर लांबी १२५ सेमी. होती. खेर्डी येथील भुरण यांच्य ...
मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला वेग देण्याच्या दृष्टीने भूसंपादन झालेल्या जागेतील घरे खाली करण्याची नोटीस घरमालकांना बजावण्यात आली आहे. चिपळूण तालुक्यातील १३ गावांतील १७७ घरमालकांना नोटीस बजावताना घर खाली करण्यास सात दिवसांची मुदत देण्यात आली ...
संतोष पोटफोडेसाखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरपा धरणाला गळती लागली आहे. धरणाची तातडीने दुरूस्ती न झाल्यास ५०० घरांना धोका आहे. शनिवारी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली.तत्कालिन राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या ...
नांदेड येथे झालेल्या दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय जलतरण अंजिक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या शंकरराव मिलके, डॉ. निशिगंधा पोंक्षे, अश्विनी नलावडे तीन स्पर्धकांनी नेत्रदीपक कामगिरी करत २० सुवर्णपदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे. ...
रत्नागिरीच्या राजापूरातील मिठगवाणे येथील रामा जैतापकर यांच्या गोठ्यामध्ये आज शनिवारी दुपारी बिबट्या शिरला. गोठ्यातील कोपऱ्यात बिबट्याने मुक्काम केला आहे. ... ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने येथील उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी शशिकांत हरेकर (रा. कामथे खुर्द) यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. ...
रत्नागिरी नगर परिषदेसाठी शासनाने मंजूर केलेली ५४ कोटी खर्चाची सुधारित नळपाणी योजना सत्ताधारी शिवसेना व विरोधक यांच्यातील दावे - प्रतिदाव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
दोन माणसे असतील तर दहा किलो धान्य आणि तीन किंवा जास्त माणसे असतील तर ३५ किलो धान्य असा अजब निकष सध्या सरकारने लावला आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेबाबत सध्या रत्नागिरी जिल्ह्यात संभ्रमाचे चित्र निर्माण झाले आहे. ...
प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरातील कार्तिकी एकादशी उत्सव यावर्षी विशेष असणार आहे. आषाढी एकादशीच्या वारीत माऊलींच्या रथासमोर रांगोळी काढत जाणारी व गिनीज बुकमध्ये नोंद झालेली रांगोळीकार राजश्री जुन्नरकर पांडुरंगाच्या रथासम ...