रत्नागिरीचे तापमान पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कमी असले तरी रत्नागिरीकरांना सध्या जगणे नकोसे झाले आहे. गेल्या काही दिवसात वाढत्या उष्णतेपेक्षा वाढलेल्या आर्द्रतेने रत्नागिरीकरांना घाम फोडला आहे. रत्नागिरीत सद्यस्थितीत आर्द्रतेचे प्रमाण हे ७५ ते ८० टक्के ...
खेड तालुक्यातील लोटे येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानच्या गोशाळेला शासनाने मंजूर केलेला १ कोटीचा निधी अद्यापही न मिळाल्याने येथील ४७५ गायी व त्यांच्या वासरांच्या चाऱ्याचा व निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची सुरक्षाच आता रामभरोसे राहिली आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट नसल्याने रात्रीच्यावेळी याठिकाणी पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. क्रीडांगणातील प्रेक्षक ...
गुहागरातील काताळे बंदरात आता लवकरच जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणीचा प्रकल्प उभा राहणार आहे. देशातील महत्त्वाच्या जहाज तोडणी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प ठरणार आहे. काताळे येथील ७.२५ एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहणार आहे. ...
दादर - मडगाव पॅसेंजर रविवारी मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात आल्यानंतर पुढे न गेल्याने संतप्त प्रवाशांनी रविवारी ४ ते ६ आकस्मिक रेलरोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रव ...
रत्नागिरी : दादर-मुंबईहून रविवारी पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात आलेली पॅसेंजर गाडी पुढे मडगावपर्यंत गेलीच नाही. यामुळे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकून पडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत रत्नागिरी रेल्वे स्थानका ...
परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये ...
चिपळूण नगर परिषदेचे बहुतांश कर ५० टक्क्यांहून कमी करण्याबाबतच्या ठरावावर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले लेखी म्हणणे सादर केले. याविषयी जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे. ...
चिपळूण तालुक्यातील खांदाट -भोईवाडी येथे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता स्कॉर्पिओ गाडी (एमएच ११ वाय २७०६) मागे घेत असताना स्कॉर्पिओच्या मागे असलेली सुमैय्या राजू मुल्ला ही तीन वर्षाची बालिका मागच्या चाकाखाली येऊन ठार झाली. ...
जिओ कंपनीचे केबल कामासाठी तालुक्यात आलेल्या कामगाराच्या ९ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्याने भारजा नदीपात्रात घडली. ...