महाराष्ट्रासह देश - विदेशातील सर्व देवरूखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी आगामी देवरुखे ब्राह्मण जागतिक परिषद १५ व १६ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार आहे. ...
रसायनाचा टँकर धुतलेले पाणी धरणात आल्यामुळे आज बुधवारी खेड शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.खेडनजीकच्या कशेडी घाटात सरस्वती मंदिरजवळ असलेल्या धबधब्याच्या पाण्यात रसायन वाहतूक करणारा टँकर काल मंगळवारी धुण्यात आला. हे रसायन मिश्रित पाणी एका पऱ्यातून वाह ...
रहाटाघर वीज उपकेंद्र, वीज मंडळाचे नाचणे कार्यालय व वीज मंडळाची कॉलनी यांच्या नळपाणी जोडण्या नगर परिषदेने गेल्या दोन दिवसांमध्ये तोडल्या आहेत. त्यामुळे वीज मंडळ व रत्नागिरी नगर परिषद यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. ...
बँकेचा मॅनेजर बोलतोय, असे सांगून बँक ग्राहकाचा एटीएम नंबर मागून घेतल्यानंतर या १६ अंकी एटीएम नंबरच्या मदतीने ग्राहकाच्या खात्यातील ३६ हजार ४३२ रुपये आॅनलाईन काढून घेणाऱ्या ठकसेनाला पूर्णगड पोलिसांनी बिहार येथून अटक केली आहे. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी सर्व कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांच्या कामावर चांगलाच परिणाम झाला आहे. ...
राज्य मराठी विकास संस्थेने तयार केलेला शालेय मराठी शब्दकोश शाळा-शाळांमध्ये फिरून पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. निधी पटवर्धन यांनी हाती घेतला आहे. ...
टाकेडे गावातील स्मिता नवृत्ती चाळके (१५) या मुलीने शनिवारी गावातील बाणशेत या तळीत उडी मारून आत्महत्या केल्याची तक्रार मंडणगड पोलीस स्थानकात देण्यात आली ...