कोकण म्हाडाकडून जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या जागांमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक घरे उभारून त्याची सोडत (लॉटरी) काढली जाणार आहे. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील व म्हाडाच्या योजनेतील घरांचा समावेश राहणार असल्याची माहिती ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये जिल्ह्यातील १६६ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत़ मात्र, लवकरच केवळ ५० शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. ...
सन २०१७-१८चे स्मार्ट ग्राम योजनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, प्रथम क्रमांक राजापूर तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने पटकावला आहे. पाचल ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे. ...
नाणार रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध डावलून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. यासाठी गठीत केलेल्या या समितीमुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, वाद उफाळण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
कोकण रेल्वे मार्गाच्या रोहा ते वीर या टप्प्याचे दुपदरीकरण डिसेंबर २०२९पर्यंत, तर उर्वरित संपूर्ण मार्गाचे दुपदरीकरण २०२० पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी चिपळुणात दिली. ...
करंजा ते आरोंदा या ५५० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्ग दुपदरीकरणासाठी राज्य शासनाकडून २५०० कोटींचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. ...
नाणार प्रकल्पाला विरोध असतानादेखील न जुमानता नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला. ...
भ्रमणध्वनी सेवेत सुधारणा व्हावी, तसेच अति जलद सेवा मिळावी, या उद्देशाने भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून सप्टेंबर महिन्यात १२ ठिकाणी नवीन टॉवर उभारण्याच्या कामास सुरूवात झाली असून, हे काम प्रगतीपथावर आहे. ...
शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील मुस्लीम कुटुंब, पटवी हिंदू देवतांसाठी लागणारे रेशमी गोंडे आणि अनंत - अनंती गुंफण्याचा वसा गेल्या दीडशे वर्षांपासून जपत आहे. ...