देवरूख शहरातील द्वारका स्वीट मार्टमधील खाद्यपदार्थांमध्ये किडी असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. देवरूखातील नागरिकांनी या स्वीट मार्टवर हल्लाबोल करत मालकाला चांगलाच प्रसाद दिला. ...
चिपळूणमध्ये ५ जुलै २०१८ रोजी भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पेण येथून होंडा सिटीने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या ४ चोरट्यांना गुन्हा अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडू ...
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक लाख पुस्तक संख्या करण्याचा संकल्प केला. १०० दिवसांत ६ हजार पुस्तके जमा करण्याचे आव्हान होते. मात्र, रत्नागिरीतील वाचकप्रेमी नागरिकांनी वाचनालयाचा संकल्प तडीस नेण्यासाठी मोठा सहयोग केला आहे. जिल्हा नगरवाचनालय एक ला ...
शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, यासाठी कोकणातले डी. एड्., बी. एड्.धारक आक्रमक बनले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांतील डी. एड्., बी. एड्.धारक आता नागपूर विधिमंडळासमोर १७ जुलै रोजी धरणे आंदोलन करणार आहेत. ...
राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोलगाव नं. २ येथील विद्यार्थ्यांनी शाळेबाहेरील एक तास या उपक्रमांतर्गत धनाजी बाणे यांच्या शेताला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी हा एक तास शेतात राबून आगळावेगळा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांसमवेत शिक्ष ...
रत्नागिरी शहरात खराब वितरण वाहिन्यांमुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पुरवठ्यावर दुर्लक्ष होत आहे, असा ठपका ठेवत नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. या प्रश्नावरून सभागृहात रणक ...
गुहागर शहरातील वरचा पाट - भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मगर आली होती. त्या मगरीला स्थानिक तरुणांनी धाडसाने पकडले. त्यानंतर मगरीला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ...
मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातील अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी सकाळपासून दरड घटविण्याचे काम सुरु होते. अणुस्कुरामार्गे जाणारी वाहतूक अन्यमार्गे व ...
चिपळूण येथील नगर परिषदेचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक हारुण घारे यांनी राजीनामा दिल्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगर परिषदेत निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी परिमल भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...
तीन ते चार दिवस कोणतेही भक्ष्य न मिळाल्याने उपासमारीने तडफडणाऱ्या ४ ते ५ महिन्यांच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील रानवी येथे घडली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यानी त्याला पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे नेले. मात्र ...