मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादीत केलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर दोन तालुक्यांमधील एकूण ३४ गावांसाठी वाढीव मोबदल्याच्या एकूण ४९ कोटी रकमेपैकी २६ कोटींचा मोबदला नुकताच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, उर्वरित २३ कोटी लवकरच ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. कोकण विभागातून ३० हजार ९१९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा गैरप्रकार व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी नियमावलीमध्ये मंडळ ...
शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत कुंडी येथील बंद घर जळाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये प्रकाश कृष्णा सावंत यांचे सुमारे २ लाख ७५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंडीतील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात य ...
चीनमध्ये नांतोंग विद्यापीठात वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या खेड तालुक्यातील तीन विद्यार्थिनी सुरक्षित असून, त्यांना चीनच्या स्थानिक प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सादिया बशीर मुजावर या विद्यार्थिनीच्या कु ...
लांबलेला पाऊस, हवामानातील सातत्यपूर्ण बदल आणि ह्यक्यारह्ण तसेच ह्यमाहाह्ण वादळ यामुळे पिकांवर परिणाम झाला आहे. यावर्षीचा आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा होणार आहे. काजूवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शिवाय वाल, कुळीथ, पावटा या पिकांची ...
आठवड्यापूर्वी घर बंद करून कामाला गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचे घर फोडून १ लाख रुपये रोख व तीन लाख रुपये किमतीचे सोने - चांदीचा दागिने चोरून गेल्याची घटना वाडिलिंबू - सापुचेतळे येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...
चिपळुणातील गोवंश हत्येच्या घटनांनंतर रत्नागिरी पोलिसांसमोर आरोपींना पकडणे आव्हान होते. मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, चेकपोस्टवर करण्यात आलेला कडक पहारा, तीन ठिकाणी करण्यात आलेली नाकाबंदी यामुळेच या प्रकरणातील खऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांन ...
मुंबई - गोवा महामार्गावरील अवघड कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या कशेडी - भोगाव बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत खेड तालुक्याच्या हद्दीतील कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याच्या एका मार्गिकेचे सुमारे ३०० मीटर लांबीचे काम पूर्ण ...
हवामानातील बदलामुळे यावर्षी हंगाम उशिरा असताना सुध्दा आॅगस्टमध्ये आलेल्या मोहोराची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यामुळेच तयार झालेला आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प आहे. ...
हे दोघेही एकाच वर्गात शिकले. त्यामुळे शाळेत नेहमी त्यांना करण-अर्जुन या नावानेच संबोधले जायचे. मात्र, त्यातील करण कोण व अर्जुन कोण, हा फरक ओळखता येत नसे. त्यांच्यात इतके साम्य आहे की, मोबाईलवर फोटो ओळखपत्र देतानादेखील दोघांचा चेहरा एकमेकांना लागू होत ...