खेड पालिकेच्या दवाखान्यात साकारतोय ऑक्सिजन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:16+5:302021-09-05T04:35:16+5:30

खेड : येथील नगर परिषदेच्या दवाखान्याच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या काेविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्रकल्प साकारण्यात येत आहे. हा ...

Oxygen project is being implemented in Khed Municipal Hospital | खेड पालिकेच्या दवाखान्यात साकारतोय ऑक्सिजन प्रकल्प

खेड पालिकेच्या दवाखान्यात साकारतोय ऑक्सिजन प्रकल्प

खेड : येथील नगर परिषदेच्या दवाखान्याच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या काेविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन प्रकल्प साकारण्यात येत आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू हाेणार असून, प्रकल्पाची नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पाहणी केली.

खेड शहरात दुसऱ्या लाटेत कोरोनाचा फैलाव वाढण्या पूर्वीच नगरपालिकेने तातडीने निर्णय घेऊन आर्थिक तरतूद करून पालिकेच्या दवाखान्यात कोविड केअर सेंटर सुरू केले. त्यासाठी उद्योजक कौस्तुभ बुटाला यांच्या माध्यमातून भरीव मदत या केअर सेंटरला सतत मिळत आहे. या सेंटरचे नाव श्रीमती उषा हिराचंद बुटाला यांच्या नावाने ठेवण्यात आले. या सेंटरमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कोराेनाबाधित रुग्णांसाठी हे सेंटर वरदान ठरले. या सेंटरमध्ये पूरक प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे नगरपालिकेच्या दवाखान्याच्या ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी यासाठी येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या निर्णयाला उद्योजक कौस्तुभ बुटाला यांचे सहकार्य लाभले असून, त्यांच्या योगदानातून ऑक्सिजन प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाची पाहणी उद्योजक कौस्तुभ बुटाला यांच्यासोबत नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केली.

Web Title: Oxygen project is being implemented in Khed Municipal Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.