हर्णै येथे आढळलेल्या बाेटीच्या मालकाचा लागला शाेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST2021-03-19T04:30:12+5:302021-03-19T04:30:12+5:30

दापाेली तालुक्यातील हर्णै येथे बेवारस स्थितीत आढळलेल्या बाेटीच्या मालकाचा शाेध लागल्याने मच्छीमारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. लाेकमत न्यूज नेटवर्क ...

The owner of the boat found at Harnai was hunted down | हर्णै येथे आढळलेल्या बाेटीच्या मालकाचा लागला शाेध

हर्णै येथे आढळलेल्या बाेटीच्या मालकाचा लागला शाेध

दापाेली तालुक्यातील हर्णै येथे बेवारस स्थितीत आढळलेल्या बाेटीच्या मालकाचा शाेध लागल्याने मच्छीमारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : तालुक्यातील हर्णै समुद्रकिनारी संशयास्पद आढळलेल्या ‘त्या’ बोटीच्या मालकाचा शोध लागला असून, ती बोट मुरुड येथील मासूम एनरकर यांच्या मालकीची असल्याचे हर्णै पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या बाेटीबाबत करण्यात आलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुरूड येथील मासूम एनरकर यांनी ही फायबर बोट पाच वर्षांपूर्वी समुद्र सफरसाठी आणली होती. दोन वर्षांपूर्वी श्रीवर्धन येथील सिद्धिकी शिरगावकर यांना दिली होती. त्यांनी दुरुस्तीसाठी आंजर्ले खाडीत ही बाेट उभी करून ठेवली हाेती. या बाेटीचा दोर तुटल्याने ती हर्णै समुद्रात आली होती. बरेच दिवस ही बाेट तेथेच राहिल्याने मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हर्णै दूरक्षेत्राचे प्रमुख मोहन कांबळे यांच्या टीमने संपूर्ण दिवस आंजर्लेखाडी परिसरात गस्त घातली होती. या बोटीच्या मालकाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेच्या आधारे त्या बोटीच्या मालकाचा शोध लावला. हर्णै समुद्रकिनारी आढळलेल्या त्या बोटीच्या प्रकरणावर पोलिसांनी पडदा टाकला असून, बोटीतून कोणीही आले नाही. तसेच ही बोट संशयास्पद नसल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: The owner of the boat found at Harnai was hunted down