शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नाखरे शाळेत गुणवत्ता वाढीसह सर्वांगिण विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:21 IST

ब्रिटीशकालीन सरकारमान्य जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, नाखरे क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबर सर्वांगिंण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पहिलीची पूर्वतयारी फेब्रुवारीपासून केली जात असून, दहावी, बारावी पॅटर्नप्रमाणे सातवीची परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थी संस्कारासाठी उपक्रम राबवून, सर्वांगिण विकास, पायाभूत सुविधांसाठी विशेष तयारी करून घेण्यात येत असल्यानेच ग्रामीण भागातील ही शाळा आदर्शवत ठरली आहे.

ठळक मुद्देनाखरे शाळेत गुणवत्ता वाढीसह सर्वांगिण विकासविद्यार्थी संस्कारासाठी उपक्रम

मेहरून नाकाडेरत्नागिरी : ब्रिटीशकालीन सरकारमान्य जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, नाखरे क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबर सर्वांगिंण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पहिलीची पूर्वतयारी फेब्रुवारीपासून केली जात असून, दहावी, बारावी पॅटर्नप्रमाणे सातवीची परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थी संस्कारासाठी उपक्रम राबवून, सर्वांगिण विकास, पायाभूत सुविधांसाठी विशेष तयारी करून घेण्यात येत असल्यानेच ग्रामीण भागातील ही शाळा आदर्शवत ठरली आहे.विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा यासाठी शाळेत अव्यक्त ते अभिव्यक्त उपक्रम राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सृजन शनिवार हा आनंददायी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या अंतंर्गत क्षेत्रभेट, चित्रकला, मनोरंजक बुद्धीवर्धक खेळ, संस्कारपर मार्गदर्शन, कागदकाम कार्यशाळा, कविता लेखन आदी व्यक्तीविकासपूरक उपक्रम शाळेत राबविण्यात येतात. शारीरिक कसरतीमध्ये मनोरे, मैदानी खेळ, योगाभ्यास यांचेही मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांची मूलभूत अभ्यास कौशल्ये आणि संस्कारक्षम वातावरणासाठी शिक्षक विशेष मेहनत घेत आहेत.गावच्या मध्यावर असलेल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. त्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी त्यांना पुस्तकांचे दोन सेट देण्यात आले आहेत. शनिवारीदप्तराविना शाळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

संस्कारगंध कार्यक्रमाद्वारे श्रवणकौशल्य विकसनावर भर दिला आहे. पालकत्त्वाचे प्रशिक्षण, महिला मेळावा, एक दिवस शाळेसाठी, तणावमुक्त वातावरण, बोलके फळे, वर्ग व्यवस्थापनात विद्यार्थी सहभाग, उपस्थिती प्रमाणपत्र, समयदान अशा विविध उपक्रमांचे फलित विद्यार्थ्यांची प्रगती आहे. त्यामुळेच ही शाळा आदर्शवत ठरली आहे.

शिक्षकांनी तन, मन,धन अर्पून शाळेचा कायापालट केला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला जात असून, पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा निर्माण होऊन सातवीचे विद्यार्थी आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी आग्रह करीत आहेत.- मोहन जाधव, पालक

विविध उपक्रम राबविताना पालक, ग्रामस्थांचे योगदान लाभते. वाढदिवसाला पुस्तके भेट देण्याच्या संकल्पनेतून सुसज्ज वाचनालय तयार झाले आहे. भाऊबीज भेट व शैक्षणिक उठाव यातून शाळेचे भौतिक रूप पालटण्यात आले आहे.- गोपाळ रोकडे, मुख्याध्यापक

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरी