शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या चारित्र्यावर संशय, डोक्यात हातोडा घालून मुलाने केला पित्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 12:53 IST

रवींद्र याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बोलत असे. एवढेच नव्हे तर आपल्या अल्पवयीन मुलाला सातत्याने हिणवत होता.

लांजा : आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या रागातून मुलाने आपल्या पित्याच्या डोक्यात हातोडा घालून खून केला. रवींद्र रावजी कांबळे (वय-४०, रा. पूनस) असे मृताचे नाव आहे. ही घटना काल, सोमवारी (दि.२१) लांजा तालुक्यातील पुनस येथे घडली. या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पूनस येथील रवींद्र रावजी कांबळे हा ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कामाला होता. त्याची पत्नी आशासेविका म्हणून काम करते. रवींद्र याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बोलत असे. एवढेच नव्हे तर आपल्या अल्पवयीन मुलाला सातत्याने हिणवत होता.सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान रवींद्र हा घरी आला आणि तो पत्नीला बोलू लागला. त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. रागाने पत्नी घराच्या मागच्या बाजूला जाऊन बसली. त्याचवेळी तेथे असलेल्या आपल्या मुलाला उद्देशून रवींद्र याने बाेलण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलाला राग अनावर झाला आणि त्याने घरामध्ये असलेल्या लोखंडी हातोड्याने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला प्रहार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.घराच्या मागच्या बाजूला बसलेल्या पत्नीला याबाबत काहीच माहिती नव्हते. राग शांत झाल्यानंतर ती घरात आली असता रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. तिने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत, रवींद्र याला उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी, रात्री २ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, पोलीस हेडकाॅन्स्टेबल अरविंद कांबळे, राजेंद्र कांबळे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, विजयकुमार चावरे, दिनेश आखाडे, भालचंद्र रेवणे, होमगार्ड याच्यासमवेत पूनस येथे दाखल झाले. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करीत आहेत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी