...अन्यथा रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:48+5:302021-03-30T04:18:48+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी बाजार समितीने शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही, तर रत्नागिरी ...

... otherwise we will blow up the office of Ratnagiri Market Committee: Nilesh Rane | ...अन्यथा रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू : नीलेश राणे

...अन्यथा रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू : नीलेश राणे

रत्नागिरी : रत्नागिरी बाजार समितीने शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही, तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू, असा कडक इशारा, माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी बाजार समितीला दिला आहे.

या संदर्भात नीलेश राणे यांनी एक ट्विट केले असून, ते यामध्ये म्हणतात की, रत्नागिरी बाजार समितीने शेतकऱ्यांवर दरोडा टाकण्याचा नवा मार्ग शोधलाय. शेतमालाच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांना दंडाच्या पावत्या दिल्या जात आहेत. बाजार फीच्या नावाखाली या पावत्या दिल्या जात असून, आमचे बीजेपीचे सहकारी पोलीस तक्रार करत आहेत. हे लगेच थांबलं नाही, तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू.

रत्नागिरी बाजार समितीमध्ये होणाऱ्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामामुळे शेतकऱ्यांना नेहमीच त्रास झाला आहे. काही वर्षांपूर्वी मच्छी वाहतुकीवरही अशा प्रकारे वसुली केली जात होती. त्यावेळीही नीलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांचे बाजार समिती लक्ष बनले होते. त्यावेळी केलेल्या आंदोलनामुळे अखेर बाजार समितीने मच्छी वाहतुकीवरच आकारण्यात येणारा दंड वसूल करणे बंद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या रत्नागिरी बाजार समितीच्या अडचणी वाढणार असून, शेतमालावर अशा प्रकारे कर किंवा दंड आकारणे बेकायदेशीर असल्याने समितीने ते तत्काळ थांबवले नाही, तर पुन्हा समिती लक्ष ठरणार, हे माजी खासदार नीलेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून दिसून येत आहे.

Web Title: ... otherwise we will blow up the office of Ratnagiri Market Committee: Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.