...अन्यथा रस्त्यावर उतरू : बारकू फुटक
By Admin | Updated: December 5, 2014 23:18 IST2014-12-05T22:25:53+5:302014-12-05T23:18:53+5:30
एस. टी. महामंडळातर्फे अपंगांना सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी वेळोवेळी निवेदन सादर करुनही केवळ आश्वासन

...अन्यथा रस्त्यावर उतरू : बारकू फुटक
चिपळूण : अपंगांना सध्या मिळत असलेली ६०० रुपये पेन्शन मान्य नाही. ही पेन्शन ३ हजारपर्यंत करावी अन्यथा अपंग बांधव रस्त्यावर उतरतील, असा इशारा अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष बारकू फुटक यांनी येथे दिला.
शहरातील विवेकानंद सभागृहामध्ये अपंग सेवा संस्था व दुर्गाशक्ती यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अपंग मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी दुर्गाशक्तीच्या अश्विनी भुस्कुटे, स्वातंत्र्यसैनिक सिंधु भुस्कुटे, संस्थेचे सचिव संतोष होळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत, दीपक म्हादे, रमेश चव्हाण, जगदीश पालांडे, अशोक पवार, गणेश चव्हाण, सोनल कारेकर, साक्षी कोलगे, मनाली जाधव, रसिका देवळेकर, सुनीता कारेकर, रश्मी मोरे, स्वाती गुप्ते, डॉ. ललिता गजमल आदींसह ३५० अपंग बांधव यावेळी उपस्थित होते. एस. टी. महामंडळातर्फे अपंगांना सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी वेळोवेळी निवेदन सादर करुनही केवळ आश्वासन दिले जात आहे. प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याची खंत फुटक यांनी व्यक्त केली. अपंगांसाठी मंजूर झालेल्या निधीचा विनियोग नीट होतो अथवा नाही, याबाबत सरकारी व खासगी आस्थापनातील अपंगांच्या भरतीबाबतही अपंगांनी जागरूक राहावे, असे आवाहन अपंग सेवा संस्थेचे सचिव संतोष होळकर यांनी केले. दुर्गाशक्ती आयोजित मोफत अपंगांची वार्षिक सहल अक्कलकोट येथे दि. २४ रोजी सकाळी ७ वाजता जाणार असून, याबाबत नावनोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)